सिल्लोड, (प्रतिनिधी) आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्रप्रमुख, पदवीधर निवडणूक संयोजक, मंडळाध्यक्ष, प्रमुख पदाधिकाऱ्याची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, भाजपा प्रदेश सचिव सुरेश बनकर, भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघता घेतले. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जिद्दी व
मेहनती आहे. इथे भारतीय जनता पार्टीचे चांगले कार्य असून कार्यकर्त्यांची असलेली निवडणूक मोठ्या ताकदिने लढू, त्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने आपल्या सोबत उभी असल्याचे संघटन मंत्री संजय कौडगे यांनी आश्वस्त केले.
त्यानिमित्ताने मतदार संघातील
मंडळातील मंडळाध्यक्षांकडून बुध समिती शक्ति केंद्रप्रमुखांचा आढावा घेतला. त्यामधील मतदार, नवीन मतदार अशा विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील
मिरकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक तायडे, जिल्हा सचिव कमलेश जी कटारिया, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्रजी जैस्वाल, सुभाष मानकर, माजी जि. प. सदस्य शिवाजीराव बुडाळ, माजी सभापती अरुण काळे, ज्ञानेश्वर तायडे, कैलास जंजाळ, सांडु दौड, मंडळाध्यक्ष मनोज
जी मोरेल्लू, नारायण खोमणे, आत्माराम पाडळे, संजय पाटील, एकनाथ हिवाळे, दत्ता बडक, शुभम अन्वीकर, साहेबराव दांडगे, आबासाहेब जंजाळ, राधाकृष्ण काकडे, अंकुश कोठाळे, अनिल खरात, सुनिल गावंडे, नारायण बडक, राहुल राठोड, संजीवन सोनवणे, मंगेश सोहणी, संतोष शिंदे, गणेश ढगे, त्रिंबक गव्हाणे, विष्णू काटकर, राजू सिरसाठ, सुनिल प्रसाद, विजय वाघ, विनोद टिकारे, आण्णा पाटील, अतुल साळवे, विश्वनाथ पाटील, रुखमण लांडगे, विकास मुळे, रावसाहेब फरकाडे, गजानन बडक, शामराव आळणे, विष्णु गव्हाणे, अतुल प्रसाद, राजू गायकवाड आदीसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.















